'उबर' चे मुंबई ऑफिस बंद, मात्र मुंबईकरांसाठी राइड-शेअरिंग सेवा सुरू राहणार
अॅपवर आधारित मुंबईकरांना भाड्याने टॅक्सी सेवा पुरविणारी अमेरिकन कंपनी उबर (UBER) ने भारतातील मुंबई ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक पातळीवर ४५ ऑफिसेस बंद करण्याच्या या
हालचालीचा भाग म्हणून ही कारवाई केली गेली आहे. तर, कंपनीच्या मते, मुंबईकरांसाठी राइड-शेअरिंग सेवा सुरू राहणार आहे.
कोविड -१९ च्या संकटामुळे व्यवसायावर वाईट परिणाम होत असल्याने, कंपनीने मुंबईतील ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे मुंबईतील ऑफिस मुंबईच्या कुर्ला भागात आहे. हे कार्यालय भारतातील गुरुग्राममध्ये कंपनीच्या मुख्यालयांतर्गत पश्चिम विभागाचे मध्यवर्ती ऑफिस होते.
कोरोनाच्या या संकटादरम्यान, उबरने आपल्या १४ टक्के कर्मचार्यांनाची कपात केली म्हणजेच ३ हजार ७०० कर्मचार्यांपैकी काढून टाकले आहे. गेल्या महिन्यात, उबरने ZOOM च्या माध्यमातून या कर्मचार्यांना व्हिडिओ कॉल केला आणि सांगितले की, कोविड -१९ महामारी एक मोठे आव्हान बनले आहेत. हे टाळण्यासाठी उबर कंपनीने कर्मचार्यांना सांगितले की, आता कंपनीला तुमची आवश्यकता नाही.