रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 30 जून 2018 (09:59 IST)

स्विस बँक देणार लवकरच अहवाल - पियुष गोयल

मोदी सरकारच्या काळ्या पैशाविरोधातील मोहिमेला धक्का बसला आहे. स्विस बँकेत ठेवण्यात येणाऱ्या भारतीयांच्या पैशांमध्ये ५० टक्क्यांची वाढ होऊन ही रक्कम ७ हजार कोटी रूपयांपर्यंत गेली असल्याचा एक अहवाल समोर आले आहे.  केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये करार झाला असून वर्षाअखेरीस स्वित्झर्लंकडून सविस्तर डेटा मिळेल अशी माहिती दिली आहे. स्विस बँकेत असलेला पैसा हा काळा पैसा नाही, ज्या भारतीयांचा पैसा बँकेत आहे त्यात भारतीय निवासी आहेत असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला.अरुण जेटली यांनी फेसबुकवर एक ब्लाग लिहून स्विस बँकेच्या प्रकरणावर खुलासा केलाय. स्विस बँकेत 50 टक्के पैसे वाढल्यामुळे नोटबंदी फेल गेली असा दावा त्यांनी खोडून काढला.
 
मात्र खरच असे होईल का ? याबबत प्रश्न चिन्हे आहेत. कारण येत्या वर्ष अखेरी अनेक राज्यात देशात निवडणुका आहेत. त्यामुळे सरकारला मोठी कारवाई शक्य होईल का ? असा प्रश्न आहे. १ जानेवारी २०१८ पासून ते आर्थिक वर्षाच्या अखेरीसपर्यंत भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या करारानुसार  संपुर्ण डेटा दिला जाईल. मात्र तो कायदेशीर की बेकायदेशीर आहे  असं का म्हणायचं ?’,असं पियुष गोयल बोलले आहेत. स्विस बँकेत ठेवण्यात येणाऱ्या भारतीयांच्या पैशांमध्ये ५० टक्क्यांची वाढ होऊन ही रक्कम ७ हजार कोटी रूपयांपर्यंत गेली आहे. भारतीयांकडून स्विस बँकेतील खात्यात थेट स्वरूपात ९९.९ कोटी स्विस फ्रँक (सुमारे ६९०० कोटी रूपये) आणि दुसऱ्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या पैशाचे प्रमाण वाढून ते १.६ कोटी स्विस फ्रँक (सुमारे ११० कोटी रूपये) इतके झाले आहे. त्यामुळे नोट बंदी आणि इतर कोणतेही कारण पैसा जमा करायला कमी पडले नाही.