शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (11:13 IST)

भाज्यांचे दर गगनाला भिडले, बाजारातील भाज्यांचे दर जाणून घ्या

सध्या सणासुदीचे दिवस आहे कोरोनामुळे महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. तेल, गॅस , डाळी, पेट्रोल ,डिझेल सह आता भाज्यांचे दर देखील वाढले आहे. यंदा अवकाळी पाऊस झाल्यामुळे भाज्यांची आवक कमी झल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाचे हाल होत आहे आता महागाई झाल्यामुळे सामान्य माणसाने खावं काय हा मोठा प्रश्न उभारला आहे. कांदे 55 तर टोमॅटो मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पूर्वी जे टोमॅटो 20 रुपये किलो ने मिळत होते ते आता 80 रुपये किलो झाले आहे. प्रत्येक भाज्यामागे 30 ते 40 रुपये प्रतिकिलोने वाढ झाली आहे. शिवाय आवक कमी झाल्यामुळे घाऊक बाजारात किमतीत वाढ झाल्याने भाज्या दुपटीने विकल्या जात आहे. पेट्रोल डिझेल च्या किमतीत देखील वाढ झाल्याने भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. सिमला मिरचीचे दर आता 80 रुपये झाले आहे पूर्वी सिमला 40 रुपये किलोच्या दराने मिळत होती.