मंगळवार, 16 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 2 एप्रिल 2016 (10:04 IST)

नटसम्राट नानांनी दिला अभिऩयाचा गुरुमंत्र.

mahesh manjarekar
व्हिस्टलिंग वुड्स इंटरनॅशनलच्या पाचव्या 'वेदा' या शैक्षणिक उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना 'नटसम्राट' हा सिनेमा दाखविण्यात आला. या उपक्रमाचा भाग म्हणून अभिनय, दिग्दर्शन, नाटक-सिनेमा याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी 'नटसम्राट' चे दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि प्रख्यात कलाकार नाना पाटेकर सोबत लेखक अभिजीत देशपांडे आणि निर्माता विश्वास जोशी उपस्थित होते. चर्चा-मुलाखतीत समन्वय साधण्यासाठी खुद्द सुभाष घई ह्यांनी पुढाकार घेतला होता.
 
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नाना पाटेकर ह्यांनी अभिनयाबद्दल महत्वाच्या कलतृप्त्या सांगितल्या. एखाद्या चांगल्या अभिनेत्यांकडे दिग्दर्शकाला जसं हवं आहे तसं अभिव्यक्त होण्याची क्षमता असायला हवी. अभिनेता हा भावभावनांचा खजिना असतो, त्यानं आपल्या खजिन्यातून योग्य वेळी अभिनयाचं योग्य रत्नं बाहेर काढायला हवं. एखाद्या वेळी दिग्दर्शक लोकांना फसवू शकेल पण खरा अभिनेता नाही. अशा शब्दांत नानांनी विद्यार्थ्यांना गुरुमंत्र दिला.
सुभाष घई ह्यांनी नटसम्राट बद्दल आपली भावना व्यक्त केली. नटसम्राट हि रंगमंचावरची एक अजरामर कलाकृती आहे. त्याचा सिनेमा करताना दिग्दर्शनाची योग्य दिशा मिळणं गरजेचं होतं. अपेक्षेप्रमाणे महेशने हे शिवधनुष्य योग्यरित्या पेललं. विक्रमजी आणि नाना ह्यांनी आपल्या अभिनयाने लोकांना मंत्रमुग्ध केलं. अश्या भावना सुभाष घई ह्यांनी व्यक्त केल्या. 'नटसम्राट' च्या संपूर्ण टिमचं मनापासून अभिनंदन करत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांनी नाना पाटेकर, महेश मांजरेकर तसेच संपुर्ण टिमचे आभार मानले.