सोमवार, 22 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 डिसेंबर 2015 (15:10 IST)

महत्त्वाकांक्षेच्या धर्तीवर फुलणारं प्रेम शासन सिनेमात

shasan maratni chitrapat
भारतीय राजकारणावर नेमके पद्धतीने भाष्य करणारा शासन सिनेमा प्रेम, महत्वाकांक्षा या भावनां देखील मार्मिकरित्या मांडल्या आहेत. या सिनेमात  प्रेम आणि महत्त्वाकांक्षेच्या भावविश्वाची नाजूक गुंफण पाहायला मिळणार आहे.

अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री मनवा नाईक यांचे हळुवार फुलत जाणारे 'प्रेम' शासन मध्ये पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने हि दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसतील.  राजकारणात येण्याचे स्वप्न बाळगणा-या तरुण युवकाची भूमिका जितेंद्र जोशीने साकारली असून मनवा नाईकने सिनेमात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. एका कंपनीच्या कामगार संघटनेचा प्रमुख असणा-या जितेंद्रची आणि मनवामध्ये खुलणारे प्रेम आणि वेळेनुरूप त्याचे बदलणारे महत्व सिनेमात अतिशय उत्तम पद्धतीने मांडले आहे.

प्रेम आणि महत्वाकांक्षा याच्यातील यात नेमकं काय जिंकतं हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना १५ जानेवारी पर्यंतची वाट हवी लागणार आहे. श्रेया फिल्म्सचे निर्माते शेखर पाठक यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला शासन सिनेमा सामान्य माणसाच्या राजकारणातील मानसिकतेचा वेध घेतला आहे.  गजेंद्र अहिरे दिग्दर्शित शासन सिनेमात अभिनेता मकरंद अनासपुरे,  भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, मनवा नाईक, अदिती भागवत,वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले,मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ . श्रीराम लागू, अमेय धारे,  किरण करमरकर  अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे.