'राक्षस' सिनेमाची कथा सातासमुद्रा पार

rakshas marathi movie
Last Modified शुक्रवार, 4 डिसेंबर 2015 (15:19 IST)
दर्जेदार सकस आणि मनोरंजनाने परिपूर्ण सिनेमे तयार करण्यात हातखंड असलेल्या नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शन हाउस निर्मित 'राक्षस' हा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला २३ नोव्हेंबर पासून सुरवात झाली आहे. सिनेमाच्या निमित्ताने मराठी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री आणि अभिनेता यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
खलनायकाची भूमिका करूनही महाराष्ट्राचा फेव्हरेट झालेला संग्राम म्हणजेच शरद या 'राक्षस' सिनेमात सकारात्मक भूमिकेत आहे. सिनेमाचा जॉनर काहीसा फॅमिली थ्रिलर आहे. त्यात एंटरटेनमेंट सोबत सस्पेन्स, थ्रिलर आणि इमोशन ड्रामा असलेला फॅमिली एंटरटेनिंग सिनेमा पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या वर्षातील हा अप्रतिम सिनेमा ठरेल. सिनेमाची कथा कौटुंबिक भावनिक दर्शन घडवणारी आहे. बालकलाकार ऋजुता देशपांडे साकारत असलेली मुन्नी ही व्यक्तिरेखा सिनेमात महत्वाची भूमिका बजावते. 'शाळा', 'फॅंड्री', 'सिद्धांत' या सिनेमाच्या यशानंतर निलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांची निर्मिती असलेले 'चौर्य', 'राक्षस' आणि 'एक नंबर' हे सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन ज्ञानेश झोटिंग यांचं असणार आहे. नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या सिनेमांचे विशेष म्हणजे आज पर्यंत ९ सिनेमांपैकी ७ दिग्दर्शकांना पदार्पणातील सिनेमा करायची संधी नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शन हाउसने दिली आहे. 'शाळा'चे सुजय डहाके, सिद्धांतचे विवेक वाघ,
'फॅंड्री'चे नागराज मंजुळे हि नावे प्रामुख्याने घेता येईल. 'राक्षस' हा सिनेमा शूट होण्याआधीच सिनेमाची कथा जगातील प्रसिद्ध आणि नामांकित दृश्यम संडन्स रायटर्स लॅबमध्ये निवड झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर राक्षसची चर्चा आधीपासून आहे. येत्या काही दिवसात तो आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजेल याबद्दल संपूर्ण
खात्री नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शनला आहे.
>


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

आज नाश्त्याला काय बनवू?

आज नाश्त्याला काय बनवू?
मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं आज नाश्त्याला काय बनवू? अन जेवायला काय ...

F9रिलीजची तारीख पुन्हा वाढविली, विन डीझेलने निराश ...

F9रिलीजची तारीख पुन्हा वाढविली, विन डीझेलने निराश चाहत्यांसह नवीन तारीख शेअर केली
मुंबईः हॉलिवूड सुपरहिट फ्रेंचायझी फास्ट अँड फ्यूरियस(Fast & Furious)चे 8 चित्रपट ...

डोकंच नाही

डोकंच नाही
जावई- सासरे बुवा तुमच्या मुलींमध्ये तर डोकंच नाही आहे

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'
मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊनच्या सावटाखाली काढल्यानंतर आता हळूहळू सर्वत्र 'न्यू नॉर्मल' ...

अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ?

अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ?
कामवाली: ताई मला 10 दिवस सुट्टी हवीये मालकीण: अगं, अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ? मग ...