संजय जाधव यांच्या 'तू ही रे' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लाँच

tu hi re
मुंबई| Last Modified मंगळवार, 7 जुलै 2015 (17:18 IST)
दुनियादारी, प्यारवाली
लव्हस्टोरी या सुपरहिट सिनेमांनंतर बॉक्स ऑफीसवर संजय जाधव यांची आणखी एकफिल्म येण्यास सज्ज होत आहे. प्रेक्षकांना 'प्रेम', 'मैत्री' या नात्यावर विश्वास ठेवायला शिकवणारे या सिनेमाच्यायादीत आणखी तू हि
रे या सिनेमाचं नाव दाखल होत आहे.
प्यारवाली लव्हस्टोरीने प्रेमाच्या एका अनोख्याजगात नेलं तर दुनियादारीने मैत्रीची सफर घडवून आणली. आता तू हि
रे प्रेक्षकांना कोणत्या वळणा वर घेऊनजाईल याबाबत आतापासून उत्सुकता निर्माण झाली आहे.
मालाड येथील इनॉबिर्ट मॉलमध्ये नुकतच संजयजाधव यांच्या आगामी तू ही रे सिनेमाचं ट्रेलर लॉच करण्यात आला. रोमॅंटिक सागा असलेल्या तू ही रे सिनेमाची झलक या निमित्ताने सगळ्यांनी अनुभवली. स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार,गिरीश ओक अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात प्रेक्षकांना पुन्हा एकदा लव्ह स्टोरी एका वेगळ्यारुपात पाहायला मिळणार आहे. संजय जाधव यांच्या चित्रपटातील काही वैशिष्ठ्यांपैकी एका म्हणजे सिनेमाची गाणी. अशी ओठांवर रेंगाळणारी गाणी गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. पंकज पडघन आणि अमितराज, शशांक पोवार या तिघांनी मिळून सिनेमाला संगीत दिल आहे. आदर्श शिंदे, अमितराज, वैशाली सामंत, उर्मिला धनगर यांनी सिनेमाची गाणी तर गायली आहेत. सिनेमाची जान म्हणजेच कथा अरविंद जगताप यांनी लिहिली आहे.प्रसाद भेंडे यांच्या कॅमेऱ्याची जादू यंदाही आपल्याला या सिनेमात दिसणार आहे.
करण एंटरटेनमेंटचे मृदुलापडवळ- ओझा, शीतल कुंमार-मानेरे, इंडियन फिल्म्स स्टूडिओचे आशिष वाघ आणि उत्पल आचार्य तसेच ड्रिमिंग ट्वेंटी फोर सेवेनचे दिपक राणे यांच्यासह संजय घोडावत हे सहनिर्माते या सिनेमासाठी यंदा एकत्र आले आहेत. तू हि रे हा सिनेमा ४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सगळ्यांनाच सिनेमाची उत्सुकता लागली आहे यात शंका नाही.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

अर्जुन रामपाल करोना पॉझिटिव्ह

अर्जुन रामपाल करोना पॉझिटिव्ह
राज्यात सातत्याने करोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बॉलीवूडचे देखील अनेक दिग्गज ...

सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावरून दिली बातमी

सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावरून दिली बातमी
Sonu Sood Corona Positve: देशातील कोरोनाची दुसरी लाट लोकांना दुप्पट वेगाने घेऊन जात आहे. ...

शर्वाणी करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण

शर्वाणी करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण
‘अवंतिका' मालिकेतील सानिका असो, ‘आंबट गोड' मधली इंदू असो, ‘स्वराज्य रक्षक संभाजी' ...

करीनाने आपल्या लहान मुलाबरोबर सैफ आणि तैमूरचा खेळत असलेला ...

करीनाने आपल्या लहान मुलाबरोबर सैफ आणि तैमूरचा खेळत असलेला फोटो शेअर केला, लिहिले- 'असा दिसतो माझा..'
करीना कपूरच्या लहान मुलाची एक झलक पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. सोशल मीडियावर ते त्याच्या ...

कोरोना परवडला पण ...

कोरोना परवडला  पण ...
1. घरात फेरफटका मारला तर ---- आताच केर काढला होता. फिरताय कशाला? एका जागी बसा ...