शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2019 (09:29 IST)

प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांच्या दोन बँग चोरी

बालनाट्य अलबत्या-गलबत्यातील चेटकिणीची भूमिका करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांच्या नाट्य प्रयोगावेळी महाकवी कालिदास कलामंदिराच्या वाहनतळात उभ्या असलेल्या टीमच्या बसमधून चोरट्यांनी दोन बॅग चोरी केल्या आहेत. ही घटना नाशिक येथे घडली आहे. यामध्ये विशेष असे की कालिदास कलामंदीराचे नुकतेच मनसेच्या आखणीप्रमाणे नुतनीकरण करण्यात आले  होते. या ठिकाणी सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले असून, तरी सुद्धा चोरट्याने येथे चोरी केली असून कोणालाही याबद्दल काहीच कळले नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
 
अलबत्या गलबत्या हा नाटकाचा प्रयोग सुरू होता, स्टेजजवळ वाहनतळात उभ्या असलेल्या बसमध्ये चोरटा शिरला आणि त्याने भर दुपारी दोन बॅगा चोरून नेल्या आहेत. चोरट्याचा हा सर्व प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मात्र हा सीसीटीव्ही इतका खराब चित्रीकरण करतोय की त्यातून पोलिसांना चोरट्याचा माग काढणे खूप अवघड झाले आहे. 
 
नाटकाच्या प्रयोगात दंग असलेल्या वैभव मांगले यांच्या टीमला हा अनुभव आला आहे. आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या सुरक्षेविषयीदेखील प्रश्नचिन्ह मात्र आता उभे राहिले आहे. यामध्ये अलबत्या गलबत्यामधील पडद्यामागील कलाकार वैभव शिंदे तसेच बसचालकाची बॅग चोरट्याने चोरली आहे. या बॅगांमध्ये पारपत्र (पासपोर्ट) मोबाईलसह अन्य महत्त्वाच्या वस्तू चोरीस गेल्या आहेत. याबाबत येथील स्थानिक भद्रकाली पोलीस ठाण्यात शिंदे यांनी चोरीची फिर्याद दिली आहे.
 
नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांनी याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिका प्रशासन सुरक्षाव्यवस्थेबाबत चूक करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे नाशिकचे कलामंदिर पुन्हा चर्चेत आले असून सुरक्षाव्यवस्था किती फोल आहे हे उघड होते आहे.