शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 2 डिसेंबर 2019 (10:30 IST)

मराठी अभिनेत्री सारा श्रवणला अटक, खंडणीचा आहे आरोप, अटकपूर्व जामीनही फेटाळला

actress-sara-shrawan-arrested-ransom-case
मराठी अभिनेत्री सारा श्रवणला पोलिसांनी खंडणी उकळल्याप्रकरणी अटक केली आहे. याप्रकरणात आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे. 15 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी अभिनेत्री सारा श्रवणवर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. “या प्रकरणात आरोपींनी सुभाषला जबरदस्ती माफी मागायला लावली आणि त्याचा व्हिडीओ चित्रीत केला.

त्यानंतर आरोपींनी हा व्हिडीओ व्हायरल न करण्याच्या बदल्यात 15 लाख रुपयांची मागणी केली. पण एका महिला अभिनेत्रीने व्हिडीओ व्हायरल केला. त्यामुळे सुभाषने सहकारनगर पोलिसांत तक्रार दाखल केली”, असं पोलिसांनी सांगितले. अभिनेत्री सारा श्रवण दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण गुन्हे शाखेने ती जाण्यापूर्वीच तिला अटक केली. हे प्रकरण गंभीर असल्यामुळे पुणे कोर्टानेही साराचा अटकपूर्व जामीन फेटाळला.