एफयूचे पोस्टर रिलीज
‘सैराट’फेम आकाश ठोसर म्हणजेच परशाचा नवा सिनेमा एफयूचं पोस्टर रिलीज झालं आहे. दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर यांचा हा सिनेमा असून, येत्या 2 जून रोजी आकाशचा हा सिनेमा रिलीज होणार आहे.अभिनेता आकाश ठोसरच्या सैराटमधील भूमिकेमुळे त्याच्या पुढच्या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर महेश मांजरेकरांच्या ‘एफयू’मधून आकाश प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.