शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' ची घोषणा

प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. प्रसाद ओक यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी सौंदर्यवती चंद्रमुखी दिसत आहे. या फोटोसोबत प्रसाद ओक यांनी कॅप्शन लिहिली आहे की, 'तो ध्येय धुरंधर राजकारणी, ती तमाशातली शुक्राची चांदणी, लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय रशीली कहाणी!, विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित, संगीतकार अजय-अतुल या जोडीसोबत प्रथमच, माझं नवं दिग्दर्शकीय पाऊल!, लवकरच!.'
 
'चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्रं आहे. या चित्रपटात राजकारण आणि तमाशा यांची उत्तम सांगड घालणारी कथा दाखवण्यात आली आहे.