शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (16:18 IST)

धर्मवीर एका भागात संपणारा विषय नसून, तो एक खंड आहे,- मंगेश देसाई

dharmavir
*धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे ' च्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने*
 
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनचरित्रावर आधारित धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे ह्या बहुचर्चित चित्रपटाचा नुकताच वर्षपूर्ती कार्यक्रम संपन्न झाला. २७ डिसेंबर २०२१ रोजी कोलशेत येथे धर्मवीरच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती, त्या दरम्यान तिथे उभारण्यात आलेल्या जुन्या आनंदआश्रम प्रतिकृतीच्या सेटवर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी चित्रपटातील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती. "धर्मवीरांच्या गोष्टी खूप बाकी आहेत, अनेक भाग करून ही त्यांच्या गोष्टी संपणाऱ्या नाहीत, त्यामुळे धर्मवीरचा दुसरा भाग २०२४ ला घेऊन येत आहोत" अशी अधिकृत घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी मुख्य कलाकार प्रसाद ओक याच्यासमवेत केली. 
धर्मवीर एका भागात संपणारा विषय नसून तो एक खंड आहे. पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती, ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल!
मात्र, यावर मंगेश देसाई यांनी असे सांगितले की, ' धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे अनेक पैलू अद्याप गुलद्त्यातच आहेत, जे लोकांपर्यत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे दुसऱ्या भागात त्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत".
शिवाय, या निमित्ताने आनंद दिघे नामक ज्वलंत व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर साकारणारा अभिनेता प्रसाद ओकच्या अभिनय कौशल्याची जादू प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येईल. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद तसेच दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे आहे.