1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑगस्ट 2020 (13:23 IST)

जॅकलीन फर्नांडीसने 'व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी' निवडण्यात आलेल्या मराठी चित्रपटाच्या समर्थनार्थ घेतला पुढाकार!

Venice International Film Festival
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसने दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा चित्रपट 'द डिसाइपल'च्या समर्थनार्थ घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे. जवळपास 20 वर्षांनंतर, व्हेनिस चित्रपट महोत्सव स्पर्धेत निवड झालेला हा मराठी चित्रपट पहिला  भारतीय चित्रपट बनला असून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. ही भारतीय सिनेमासाठी एक खूप मोठी  उपलब्धी आहे आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी पुढे आलेली जॅकलीन ही पहिली मुख्य प्रवाहातली अभिनेत्री आहे.
 
एक उत्तम कथा, ग्रहणशील प्रेक्षक आणि जॅकलीन सारख्या प्रभावशाली अभिनेत्रीच्या समर्थनामुळे, प्रादेशिक  सिनेमाला पुढे येण्यासाठी आणि वैश्विक प्रभाव निर्माण करण्यासाठी मदत मिळेल. जॅकलीन चांगल्या कथेचा भाग होण्यासाठी उत्सुक असते आणि अशा प्रादेशिक सिनेमाला प्रोत्साहित करण्यावर विश्वास ठेवते ज्याची पात्रता असूनही त्याच्या हक्काचे समर्थन मिळत नाही.
 
स्पर्धेसाठी निवड झाल्यापासून 'द डिसायपल' अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. त्यापैकी एक म्हणजे या चित्रपटाला विशेषत: बॉलीवूडच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे, कारण बॉलीवूड हा भारतीय सिनेमाचा मुख्य प्रवाह असून त्याची पोच अधिक आहे. यामुळे सिनेमाचा व्यासपीठ अधिक व्यापक आणि स्वीकारार्ह बनणार आहे. जॅकलिन ही बॉलिवूडची अग्रणी अभिनेत्री असून तिच्या सोशल मीडियाच्या आवाका मोठा आहे. तिच्याकडून मिळालेला हा पाठिंबा आणि प्रोत्साहन नक्कीच या चित्रपटाकडे अनेकांचे लक्ष वेधणारा ठरणार आहे.
 
जॅकलिन ही एक उत्तम व्यक्ती आहे आणि ती मानव कल्याणासाठी करत असलेल्या कृतीतून हे वेळोवेळी प्रतिबिंबित झाले आहे. कोरोना विषयी जागरूकता वाढविण्यासाठी कोरोनाग्रस्त व्यक्तींसोबत बोलणे असो किंवा प्राणी कल्याणासाठी केलेले कार्य, जॅकलिनने नेहमीच आपल्या मदतीचा हात आवश्यकता असलेल्यांसाठी पुढे केला आहे. तिच्या या परोपकारी दृष्टिकोनामुळे ती नेहमीच तिच्या चाहत्यांकडून होणाऱ्या कौतुकास पात्र ठरत आली आहे आणि सोशल मीडियावरील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक ठरली आहे.