Widgets Magazine
Widgets Magazine

मंदार लिखित 'सरगम'

mandar

मराठी सिनेसृष्टीतील कवीमनाचा माणूस अशी ओळख असणारा मंदार चोळकर एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आतापर्यत अनेक सिनेमांच्या गाण्यांचे तसेच मालिकांचे शीर्षक गीत लिहिणारा मंदार लवकरच 'सरगम' चे लेखन करताना दिसून येणार आहे सरगम हे एका गाण्याचे सूर नसून तर एका कार्यक्रमाचे नाव आहे. झी युवा वाहिनीवर प्रसारित होत असलेल्या सरगम या संगीत विषयक कार्यक्रमाच्या भागांचे मंदार सध्या लिखाण करीत आहे, त्यामुळे आता तो गीतकार असण्यासोबतच लेखकदेखील बनला आहे. 
 
याविषयी सांगताना मंदारने सांगितले की, मी आतापर्यत केवळ गीतलेखन केले आहे, त्यामुळे जेव्हा मला या कार्यक्रमासाठी निर्मात्यांकडून विचारण्यात आले, तेव्हा सुरुवातीला हे काम मला खूप कठीण वाटले होते. पण, या कार्यक्रमाचे काही भाग लिहिल्यानंतर मला आता ते खूप सोपं वाटू लागलं आहे. या कार्यक्रमात येणाऱ्या दिग्गजांविषयीची माहिती कार्यक्रमाद्वारे दिली जाते. अशावेळी त्यांच्याबद्दलची माहिती तसेच त्यांचे किस्से माहित असलेला व्यक्ती गरजेचा होता. मी यातील अनेकांसोबत काम केले असल्यामुळे मला ते अगदी सहज गेलं, हे काम करायला खूप मजा येत असून खूप काही शिकायला देखील मिळत आहे, असे मंदार सांगतो. पूर्वी असे कार्यक्रम हे वेळखाऊ असतात असे मंदारला वाटायचे, त्यामुळे यापासून तो काहीकाळ दूरच राहिला होता, पण आता तो हे सगळे एन्जॉय करत असून याबरोबरच त्याचे गाणी लिहिणेदेखील सुरूच आहे. विशेष म्हणजे नवनिर्वाचित लेखक बनलेल्या मंदारने 'सरगम' चे शीर्षक गीतदेखील लिहिले आहे.  Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी सिनेमा

news

‘संघर्षयात्रा’ 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा बायोपिक ‘संघर्षयात्रा’ सिनेमा 14 एप्रिल ...

news

गुलशन देवय्या मांडणार मराठीत 'डाव'

मराठी चित्रपटाचा विषय आणि प्रसिद्धी लक्षात घेता, बॉलीवूडकरांच्या नजरा मराठी सिनेसृष्टीकडे ...

news

आमिर खानची 'चला हवा येऊ द्या' मध्ये हजेरी

आमिर खानने 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात हजेरी लावली आहे. आमिर आणि सत्यमेव जयतेची टीम ...

news

मराठी रॅपर श्रेयश जाधव ची 'वीर मराठे' मधून शिवरायांना मानवंदना

'पुणे रॅप' च्या घवघवीत यशानंतर रॅपर श्रेयश जाधव पुन्हा एकदा एक नवेकोरे रॅपसॉंग ...

Widgets Magazine