शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (12:28 IST)

अभिनेत्री ईश्वरी देशपांडेसह मित्राचा गोव्यात मृत्यू

गोव्यातील बागा-कलंगुट येथील एका पुलावरून कार गाडी खाडीत कोसळल्याने पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडेसह तिच्या मित्राचा मृत्यू झाला आहे. शुभम देडगे असं तिच्या मित्राचं नावं आहे. हा अपघात घडल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
शुभम आणि ईश्वरी बुधवारी पुण्यातून गोव्याला फिरायला गेले होते. दरम्यान सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास बागा येथील अरुंद रस्त्यावर ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी सरळ खाडीत जाऊन कोसळली. अपघात झाल्यानंतर ईश्वरी आणि शुभम सेंट्रल लॉकमुळे गाडीतच अडकले. त्यानंतर नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
 
अभिनेत्री ईश्वरी देशपांडे व तिचा मित्र शुभम देडगे यांची अनेक वर्षापासून मैत्री होती. पुढच्या महिन्यात दोघांचा साखरपुडा होणार होता पण त्यापूर्वीच नियतीने दोघांनाही नेले. ईश्वरी ही पाषाण-सूस परिसरात वास्तव्याला होती. तर शुभम हा नांदेड सिटी परिसरातील रहिवासी होता.
 
ईश्वरीने काही दिवसांपूर्वी तिची भूमिका असलेल्या मराठी आणि एका हिंदी चित्रपटाच चित्रीकरण पूर्ण केलं होतं. दोन्ही चित्रपटाचे प्रदर्शनापूर्वीची कामे राहिली आहेत. अपघातात दोघांचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.