शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2017 (16:02 IST)

मोहक प्रेमाच्या आक्रमक कथेचा साक्षीदार 'तलाव'

तलावाच्या काठाशी फुलणाऱ्या सुंदर प्रेमाला ईर्ष्या आणि लोभाची लागलेली झळ 'तलाव' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. प्रगतीच्या वाटेवर असलेला सिद्धू आणि लेखिका म्हणून नाव कमवू पाहणारी कादंबरी या दोघांची ही प्रेमकहाणी या सिनेमाचा गाभा आहे. एसमव्ही फिल्म्स आणि रेणूइंडिया एंटरटेनमेंट प्रस्तुत हा सिनेमा येत्या १० मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. निर्माते नवनीत फोंडके आणि जयभीम कांबळे दिग्दर्शित तलाव चित्रपटात अभिनेता सौरभ गोखले, संजय खापरे, प्रियांका राऊत, नवनीत फोंडके, वर्षा पवार यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. अभिनेत्री प्रियांका राऊत हिच्या निमित्ताने एक नवा चेहरा सिनेसृष्टीला मिळाला आहे. या सिनेमाचं विशेष म्हणजे यातील बरीच कलाकार मंडळी नवखी आहेत. गायक नंदेश उमप आणि आदर्श शिंदे यांच्या भारदस्त आवाजातील गाण्यामुळे  तलाव या सिनेमातील गाण्यांना एक वेगळीच लकाकी मिळाली आहे. व्हिडियो पॅलेसच्या माध्यमातून या सिनेमाच्या गाण्यांचा आनंद प्रेक्षक घेतील. सिबा पीआर अँड मार्केटींग यांनी सिनेमाची प्रसिद्धी सांभाळली आहे. अभिनेता संजय खापरे यांनी साकारलेला मुजोर, गर्विष्ठ आणि उन्मत्त धनंजय पाटील आपल्या सभोवताली असणाऱ्या समाज कंटकांची  नेमकी प्रतिमा उभी करतो. निसर्गासारखं रम्य, स्वच्छ आणि मोहक प्रेम एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून गेल्यावर राहते निव्वळ नीरसता. आयुष्यात आलेली तलावासारखी शांतता आणि स्तब्धता या सिनेमातून नेमकीपणाने दाखविली आहे.