गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 8 फेब्रुवारी 2017 (12:39 IST)

रिचमंड एंटरटेंटमेंटच्या आगळ्यावेगळ्या म्युजीकल ‘फिलिंग्स’

मनाचा थांगपत्ता लावणं कठीणच. कधी प्रणयात बेधुंद रंगणार, तर कधी पावसाच्या सरीमध्ये ओलचिंब होऊन भिजणार,कधी आपल्याच गुंत्यात खोलवर गुंतणार तर कधी बेभान होऊन स्वैर जीवन जगणारं.मानवी भावनांचा वेध घेणाऱ्या अश्या दर्जेदार गाण्यांच्या यादीत रिचमंड एंटरटेंटमेंट प्रस्तुत 'फिलिंग्स' या म्युझिक अल्बमचा देखील समावेश होतो. १२ दिग्गज गायक आणि चित्रपट कलावंतांचा समावेश असणाऱ्या या अल्बममध्ये प्रणय,विरह,श्रुंगार,प्रेम,प्रोत्साहन आणि पाऊस या थीम्सवर आधारित गाणी आहेत. विशेष म्हणजे, श्रेया घोषाल, स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, आदर्श शिंदे अशा नामांकित गायकांचा आवाज या म्युजिक अल्बमला लाभला असून मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते महेश मांजरेकर,सचिन खेडेकर,जितेंद्र जोशी, अवधूत गुप्ते, संतोष जुवेकर प्रिया बापट, स्पृहा जोशी, आणि तरुणाईची धडकन सोनाली कुलकर्णी या कलाकारांच्या आवाजाची जादूदेखील आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. नुकतेच या म्युजिक अल्बमचे अंधेरी येथील 'द क्लब' मध्ये मराठीचे अष्टपैलू कलाकार सचिन पिळगावकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. १२ दर्जेदार कलावंतांची म्युजीकल 'फिलिंग' देणाऱ्या या सुमधुर गाण्यांवर चित्रित केलेले ऑडियो लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. तरी, या अल्बमची झलक म्हणून भूषण प्रधान आणि प्राजक्ता माळी या देखण्या जोडीवर चित्रित केलेले प्रेमगीत लोकांसमोर सादर करण्यात आले आहे.
 
याबद्दल सांगताना रिचमंड ग्रुपचे युवा निर्माते अभिषेक विचारे यांनी सांगितले कि, 'फिलिंग्स' हा म्युजिक अल्बम  स्वतःच एका उत्तम कलाकृतीच उदाहरण आहे कारण इतक्या दिग्गज कलाकारांचाआवाज,अप्रतिम संगीत आणि श्रोत्यांची मन जिंकणारे शब्द आणि अभिनय असं संमिश्र मिश्रण रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ही फक्त सुरवात आहे रिचमंड एंटरटेंटमेंटच्या माध्यमातून मराठीच नव्हे तर मनोरंजनाच्या या क्षेत्रात चित्रपट,नाटक,वाहिन्या,वाद्यवृंद अश्या विविधांगी क्षेत्रात अगदी बॉलीवूड पर्यंत झेप घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. मानवी स्वभावगुणांचे अचूक टिपण करणारी हि गाणी प्रत्येक वयोगटातील श्रोत्यांना भुरळ पाडणारी आहेत. किरण विलास खोत हे या अल्बमचे गीतकार-संगीतकार आहेत.ते म्हणतात "गीतकार आणि संगीत दिग्दर्शक या नात्याने 'फिलिंग' या अल्बमसाठी मी रिचमंड ग्रुपचा खूप आभारी आहे. आणि माझ्यासाठी ही एक फक्त सुरुवात असून, यानंतर अशा विविध प्रोजेक्ट आणि संगीतामार्फत माझी मजल दरमजल निरंतर चालू राहील. या अल्बममध्ये काम करण्यास संधी दिल्याबद्दल मी माझे प्रेरणास्थान आदरणीय भास्कर विचारे(दाजी),व्यवस्थापक अभिषेक विचारे तसेच बोर्ड ऑफ डीरेक्टर अमोल उतेकर आणि अमोल सावंत यांचे मनपूर्वक आभार मानतो."

 
तरुण मनाला संगीताची नवी 'फिलिंग' बहाल करणारा हा मुजिक अल्बम लवकरच गाना,सावन,आयट्यूनस,हंगामा  सर्वच डिजिटल वाहिन्यामार्फत श्रोत्यांना ऐकायला आणि ९ एक्स झकास, मायबोली वर तसच रिचमंड एंटरटेंटमेंटच्या आणि शेमारू (डिजिटल पार्टनर) यांच्या  यु-ट्यूब व्हिडियोवर टप्याटप्याने पाहायला देखील मिळतील.