Widgets Magazine
Widgets Magazine

पोस्टरमधील 'बॉईज' बाबत वाढली उत्सुकता

marathi movie

किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेवर भाष्य करणारा 'बॉईज' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर या सिनेमाचा टिझर लाँच करण्यात आला. या सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक यांच्या सहाय्याने प्रस्तुतकर्ते अवधूत गुप्ते यांनी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 'बॉईज' चा टिझर लाँच केला. पौगंडावस्थेतील मुलांची मानसिकता, प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांची विचार करण्याची अनोखी पद्धत असे बरेच काही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तीन मित्रांचा पाठमोरा लुक असणारा या सिनेमाचा टिझर सोशल नेट्वर्किंग साईटवर चर्चेचा विषय ठरत आहे कारण, यापूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या टिजर पोस्टरमध्येदेखील हेच दृश्य पाहायला मिळाले असल्याकारणामुळे, पोस्टरवरील ते 'बॉईज' नेमकी कोण आहेत? याची उत्सुकता वाढली आहे.  
 
'सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली; लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी निर्मिती केली असून, विशाल देवरुखकर या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. तसेच अवधूत गुप्ते प्रथमच या चित्रपटाच्या निमित्ताने प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. ह्या सिनेमाच्या मोशन पोस्टरमुळे सिनेमा युथ इंटरटेनिंग असल्याचे जाणवते. घरापासून दूर हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या युवा पिढीची दुनिया यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, येत्या युथ फेस्टीवल सीझनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील पोस्टरवरील ते तीन 'बॉईज' कोण हे जाणून घ्यायचे असेल, तर आणखीन काही दिवस वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही.
 Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी सिनेमा

news

पूजाच्या प्रेग्नंसीचे गुपित उलगडले

मराठी तरुणांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ग्लॅम अभिनेत्री पूजा सावंत चक्क प्रेग्नंट असल्याची ...

news

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर लवकरच ‘बाहुबली’!

बाहुबली हा चित्रपट जेवढा लोकप्रिय ठरला त्यापेक्षाही जास्त चर्चिला गेला याचा पुढचा भाग ...

news

मराठीतील छोटे 'जय - वीरु'

शालेय जीवनातील दोन अल्लड मित्रांच्या कथेवर आधारित अंड्याचा फंडा या सिनेमाचा ट्रेलर सध्या ...

news

रिले सिंगिंगच्या सरावाची जय्यत तयारी

पद्म्श्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनपटावर आधारित डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज ...

Widgets Magazine