मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जुलै 2017 (14:35 IST)

आदर्श- आनंदी यांच्या आवाजात 'मोरया -तुझ्या नामाचा गजर'

सप्तसूर म्युझिक कंपनी निर्मित आणि मेघा घाडगे अभिनित "काटाकिर्रर्र" हे गाणं आपल्या चांगल्याच परिचयाचं आहे. आदर्श  शिंदे यांच्या आवाजातील  या गाण्याने गेल्या  काही महिन्यातच सोशल  मीडियावर  धुमाकूळ  घातला आहे. अनेकमराठी सिनेमांमधून आपण आदर्श शिंदे यांच्या आवाजाची जादू अनुभवली आहे.

'दुनियादारी' या सिनेमातील "देवा तुझ्यागाभाऱ्याला" गाणं असो किंवा 'दगडी चाळ' मधील "मोरया" हे गाणं त्याच्या आवाजाने गाण्याला एक वेगळा साज येतो.

"काटाकिर्रर्र" या गाण्याची निर्मिती सप्तसूर म्युझिक कंपनीचे सर्वेसर्वा मंगेश मोरे यांनी केली असून आशिष मोरे यांनी हेगाणं संगीतबद्ध केलं होतं.

"कुलदैवत महाराष्ट्राचे" हा सप्तसूर म्युझिक कंपनीचा पहिला वाहिला म्युझिक अल्बम असूनयात १५ भक्तीपर गीते सादर करण्यात आली आहेत. खंडोबाचा मंत्र या म्युझिक कंपनीने पहिल्यांदा लोकांसमोर आणलाआहे. यानंतर निर्मिती करण्यात आली ती "काटाकिर्रर" या म्युझिक सिंगलची.   
 
काटाकिर्ररची हीच टीम आपल्यासाठी गणपतीची स्तुती सांगणार एक गाणं घेऊन येत आहे. गणपती हा आपल्यासगळ्यांचा लाडका असून त्याच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. "मोरया -तुझ्या नामाचा गजर"  हे  या  गाण्याचे नावअसून नुकतंच या गाण्याचं रेकॉर्डिंग एन्झी स्टुडिओ येथे करण्यात आलं.  "आदी तु अनंत  तु तु  गणनायका, शिवसुतागिरिजात्मजा तु गणनायका" असे या गाण्याचे बोल असून अमिताभ आर्य यांनी बोल लिहिले आहेत.  
 
आशिष मोरे यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे गणेश सातार्डेकर संगीत संयोजन  केले आहे. गणपतीची स्तुतीकरणाऱ्या गाण्यात आदर्श शिंदे यांच्यासोबत आनंदी जोशी यांचादेखील आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. "दुनियादारी", "डबल सीट", "पिंडदान", "नारबाची वाडी"  यांसारख्या  सिनेमातून  आनंदी  जोशींचा  मंजुळ  आवाज ऐकला आहे,तर आशिष मोरे यांनी शान, कुणाल गांजावाला, जावेद अली, सुरेश वाडकर, अमृता फडणवीस यांसारख्या दिग्गजगायकांबरोबर काम केले आहे. आशिष मोरे यांचा "एक आमचा बाणा" हे महाराष्ट्राचं गौरवगीत असलेला गाणं नुकताचप्रदर्शित झालं असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या गाण्याला मिळाला आहे. गणेशाची स्तुती करणारं आदर्श- आनंदीच्यास्वरातील हे गाणं लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.