बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जुलै 2017 (12:59 IST)

मल्टीस्टारच्या उपस्थित पार पडला "बसस्टॉपचा" प्रीमियर

marathi movie bus stop music launch
गणराज असोशिएट्स प्रस्तुत श्रेयश जाधव निर्मित आणि समीर हेमंत जोशी दिग्दर्शित “बसस्टॉप” सिनेमाचा दिमाखदार प्रीमियर अंधेरीमध्ये पार पडला. अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, सीमा चांदेकर सिनेमातील या स्टारकास्टने उपस्थिती लावून प्रीमियरसोहळ्याची शान वाढवली.


तसेच सुयश टिळक, श्वेता मेहंदळे, रीना अग्रवाल ही स्टारमंडळी देखील यावेळेस उपस्थित होती. या सिनेमाच्या निर्मितीसाठी श्रेयश जाधव बरोबरच पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी या तिघांनी देखील महत्वाची धुरा निभावली आहे.