स्वप्नील-रुचा चा रोमान्स दाखवणारे 'ये आता' गाणे प्रदर्शित Video

marathi movie
Last Modified गुरूवार, 20 जुलै 2017 (12:46 IST)
मराठी चित्रपटसृष्टीचा रोमँटिक हिरो स्वप्नील जोशीचा सिनेमा म्हंटल्यावर त्यात एखादे प्रेमगीत हे असायलाच हवे !
स्वप्नील आणि रोमान्स हे सूत्र आगामी 'भिकारी' सिनेमातील 'ये आता' या गाण्यातही आपल्याला पाहायला मिळत आहे. मी मराठा एंटरटेनमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच जीसिम्सचे कार्तिक निशानदार व अर्जुन बरन यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमातील 'ये आता' हे रॉमेंटिक गाणे सध्या खूप गाजत आहे. नवोदित अभिनेत्री रुचा इनामदार आणि स्वप्नील जोशीवर आधारित असलेल्या या गाण्यातील दृश्य पाहणाऱ्यांची डोळे दिपवून टाकत आहे.
marathi movie
'स्वामी तिन्ही जगाचा...भिकारी' या सिनेमाच्या प्रत्येक गाण्यात दिग्दर्शक गणेश आचार्य यांचा स्पेशल टच दिसून येत असल्यामुळे, 'ये आता' हे प्रेमगीतदेखील त्याला अपवाद नाही. छायाचित्रकार महेश लिमये यांच्या कॅमेऱ्यात चित्रबद्ध झालेल्या या गाण्यातील दृश्य लंडन येथे चित्रित करण्यात आली असून, यात स्वप्नील आणि रुचाची एक वेगळीच कॅमिस्ट्री रसिकांना पाहायला मिळत आहे.
marathi movie
गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला विशाल मिश्रा यांनी संगीत दिले असून, स्वप्नीलचे बोल खुद्द विशाल मिश्रा यांनीच गायले आहेत. तसेच हिंदीची सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने रुचाचे बोल गात, हे गाणे अधिकच सुमधुर केले आहे. आई आणि मुलाच्या भावनिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा येत्या ४ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. यात स्वप्नील जोशी आणि रुचा इनामदार या जोडीसोबतच कीर्ती आडारकर, गुरु ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा ह्या कलाकारांचीदेखील विशेष भूमिका असणार आहे.





यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

डोकंच नाही

डोकंच नाही
जावई- सासरे बुवा तुमच्या मुलींमध्ये तर डोकंच नाही आहे

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'
मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊनच्या सावटाखाली काढल्यानंतर आता हळूहळू सर्वत्र 'न्यू नॉर्मल' ...

अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ?

अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ?
कामवाली: ताई मला 10 दिवस सुट्टी हवीये मालकीण: अगं, अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ? मग ...

‘द मैरिड वुमन’च्या प्रदर्शनाआधी एकता कपूर, रिद्धि आणि ...

‘द मैरिड वुमन’च्या प्रदर्शनाआधी एकता कपूर, रिद्धि आणि मोनिका डोगरा यांनी घेतले अजमेर शरीफचे आशीर्वाद!
बहुचर्चित-वेब शो, 'द मैरिड वुमन' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर कंटेंट क्वीन ...

दोन पेग झाल्यावर वाघ उठला

दोन पेग झाल्यावर वाघ उठला
बैल आणि वाघ प्यायला बसले. दोन पेग झाल्यावर वाघ उठला.