शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 25 मार्च 2020 (09:58 IST)

महेश मांजरेकर यांचा नवा लुक पाहिला का?

new look of mahesh manjarekar
अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक व ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालक अशा विविध भूमिका पार पाडणाऱ्या महेश मांजरेकरांनी सोशल मीडियावर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमधील त्यांचा बदललेला लूक थक्क करणारा आहे.  ६१ वर्षीय महेश मांजरेकर यांनी आठ महिन्यांत वजन कमी करून स्वत:चा लूक पूर्णपणे बदलला आहे. 
 
वजन कमी करण्यापूर्वीचा व नंतरचा असे दोन फोटो महेश मांजरेकरांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘इच्छा तेथे मार्ग…आठ महिन्यांच्या परिश्रमाचं हे फळ आहे. जर मी हे साध्य करू शकलो तर हे कोणीही सहज करू शकतो.’ त्यांच्या या फोटोवर कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव होत आहे. वजन कमी करण्यासाठी काय केलं असा प्रश्न अनेकजण त्यांना विचारत आहेत.