गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (14:38 IST)

प्रवीण तरडे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं

Pravin Tarde
दिग्दर्शक प्रवीण तरडेचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. धर्मवीर आनंद दीघे यांच्या जीवनावर आणि राजकीय प्रवासावर आधारीत धर्मवीर या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर तगडी कमाई केली. बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई करणारा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाची सध्या राजकीय परिस्थितीशीही जुळवणी केली जात आहे. त्यामुळेच, या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे हे सध्या चर्चेतही असतात. मात्र, आता ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.
 
प्रवीण तरडे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं असून इंस्टाग्रामवरुन त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. माझ्या फेबसबुकवरून मेसेज आल्यास त्याला रिप्लाय करू नका असं आवाहनही त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून केलं आहे. एका पाठोपाठ एक हिट सिनेमांमुळे प्रवीण यांचा सोशल मीडियावरील वावर प्रचंड वाढला आहे. त्यातच, आपल्या गावाकडचे शेतातील, वडिलांसोबतचे व्हिडिओही त्यांनी अनेकदा फेसबुकवरुन शेअर केले आहेत. सोशल मीडियावर त्यांची सक्रीयता असते. त्यामुळेच, फेसबुक अकाऊंट हॅक झाल्यामुळे ते काहीसे चिंतेत आहेत. प्रवीण यांच्या या अकाउंटवरून अनेक खोट्या लिंक्स तसेच फोन नंबरची मागणी केली जात आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor