नाट्यगृहांत सुविधांचा अभाव : रंगकर्मींमध्ये नाराजी

गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (17:15 IST)

Widgets Magazine

कुठे उंदरांचा सुळसुळाट, तर कुठे दरवाजांना कड्या नाहीत, कुठे स्वच्छतागृहच अस्वच्छ
 
काही दिवसांपूर्वी अभिनेता सुमित राघवन यांनी फेसबुक या सोशल साईटवर एक व्हिडियो शेअर केला आणि अवघ्या नाट्य व कला सृष्टीत चर्चेचा विषय ठरलाय. त्याचे झाले असे कि काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त सुमित आणि चिन्मयी राघवन हे दोघे डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात गेले असता, त्यांना व्हीआयपी रूममध्ये बसण्याची सोय करण्यात आली. मात्र हि व्हीआयपी रूम अगदीच दुरवस्थेत होती. तेथे कुबट असा वासही येत होता. यावर उपरोधिक असा व्हिडियो सुमित याने सोशल साईटवर टाकला. आणि समस्त नाट्यसृष्टीतून नाराजीचा एकच सूर उमटला आहे. नाट्यगृहातील या असुविधांविषयी रंगकर्मींनी खेद व्यक्त करत खटकणार्या बाबींवर प्रकाश टाकला आहे. याच मुद्द्यावरच्या या काही प्रातिनिधीक प्रतिक्रिया...
 
vaibhav mangale
लोकांना स्वच्छतेचं महत्त्व केव्हा पटेल कोण जाणे? - वैभव मांगले, अभिनेता
मुंबई आणि मुंबई बाहेरची सगळी नाट्यगृह कुठल्या ना कुठल्या प्रकारे वाईट आहेत. कुठे ध्वनी व्यवस्थित नाही, तर कुठे स्वछतागृह चांगली नाहीत. काही ठिकाणी मेकअप रूम उबट-कुबट वासाने भरलेली असते तर काही ठिकाणी थिएटरचं व्यवस्थित नाही. कुठे रंगमंच व्यवस्थित नाही. मुख्य समस्या हि स्वछतागृहांचीच आहे. ती कधीच स्वच्छ नसतात. मुळात या समस्येविषयी कुणालाच काही पडलेली नाहीये. म्हणून हे सगळं चाललेलं आहे. रेल्वे स्थानक असो किंवा नाट्यगृह सगळीकडे अस्वच्छताच असते आपल्याकडे. अजून किती वर्ष जाणार आहेत स्वच्छतेचं महत्त्व पटायला कोण जाणे?
 
shilpa
 स्वच्छता राखणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी - शिल्पा नवलकर, लेखिका / अभिनेत्री
संपूर्ण महाराष्ट्रातीलच नाट्यगृहांची दुरवस्था आहे. आमच्या 'सेल्फी' नाटकाचा प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहात प्रयोग सुरु असतानाच हातभर मोठी असलेली एक पाल अचानक तेथे स्टेजच्या मध्यभागी ठेवलेल्या टेबलावर पडली. आणि त्यामुळे काही काळ प्रयोग थांबवावाच लागला. विले पार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात तर डासांचा हौदोस असतो. अगदी स्टेजवरसुद्धा त्यांचा त्रास जाणवत असतो. कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृहातील मेकअप रूमच्या पडद्यावरच रहात असलेल्या उंदराशी तर मैत्रीच होते आपली. सुरुवातीला अत्यन्त सुंदर आणि सुशोभित असलेले नाट्यगृह काही काळानंतर अत्यन्त वाईट अवस्थेत असते. प्रयोगाच्या आधी मेकअप रूममध्ये गेल्यावर पहिले काम करावे लागते ते म्हणजे आरसा साफ करणे. त्यानंतर तेथील खुर्ची व्यवस्थित असेल तर त्यावरची धूळ पुसावी लागते. हि मुंबई-पुणे येथील नाट्यगृहांची अवस्था आहे. तर महाराष्ट्राबाहेर काय अवस्था असेल हा विचार न केलेलाच बरा. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणच्या नाट्यगृहांमध्ये महिलांना कपडे बदलण्यासाठी असलेल्या रूमचे दरवाजेही लागत नाहीत. खिडक्या तुटलेल्या, त्यावर पडदा नाही, अशा परिस्थितीत कपडे कसे बदलायचे? त्याचबरोबर प्रयोगात एक-एक सेकंदही महत्त्वाचा असतो. एका विंगेतून दुसऱ्या विंगेत जाताना तेथील लाद्यासुद्धा उखडलेल्या अवस्थेत असतात. त्यावेळी अंधारात अनेकदा पायाला लागतंसुध्दा. एका नाट्यगृहात तर मेकअप रूमच्या एका संपूर्ण भिंतीवर लिपस्टिकचे  डाग होते. हि कलाकार आणि नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, नाट्यगृह स्वच्छ ठेवण्याची. आम्ही 'सेल्फी' नाटकासाठी जेव्हा जातो तेव्हा स्वतः चा कचऱ्याचा डबा घेऊन जातो. कारण तेथे कचऱ्याचा डबा नसतोच. त्यामुळे स्वच्छता राखणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे, असे मला वाटते. 



Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी सिनेमा

news

प्रेक्षकांसाठी 'फुगे' सिनेमाचे प्रदर्शन लांबवले

देशातील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी अवलंबिलेल्या ५००आणि १००० रुपयाच्या नोटा रद्द ...

news

मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत दिसणार नोटाबंदीचे पडसाद

भारतातून काळ्या पाश्याचा नायनाट करण्यासाठी केंद्रसरकारने उचललेल्या चलनबदलांच्या निर्णयावर ...

news

नोट बंदीनंतरही ‘व्हेंटिलेटर’ ला सकारात्मक प्रतिसाद

देशामध्ये अनेक व्यवसाय आणि उद्योगांना नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसला आहे. यात नाटक आणि ...

news

‘विकता का उत्तर’ च्या सेटवर पहिल्यांदाच करावा लागला ट्रेडर्सना‘भाव’

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विकता का उत्तर’ हा कार्यक्रम दिवसेंदिवस रंगात येत असून त्याची ...

Widgets Magazine