बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 डिसेंबर 2018 (13:22 IST)

'मुळशी पॅटर्न'नंतर आता 'रेती पॅटर्न'

सध्या राज्यभरात 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या या चित्रपटावर सुरुवातीला बरीच टिकाटिप्पणी झाली पण जेव्हा चित्रपटगृहांत तो प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. शेतकरी, गुन्हेगारी आणि पोलीस यांच्यावर आधारित सहकुटुंब पाहता येईल असा चित्रपट प्रवीण तरडेंनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. हा चित्रपट, त्याचे कथानक, संवाद यांसोबतच आणखीएका गोष्टीने लोकांची मनं जिंकली आहे ती म्हणजे प्रवीण तरडे यांची बेधडक वक्तव्यं आणि मतं. शेतकर्‍यांवर होणारा अन्याय, विकासांचे पर्याय शोधताना शेतकर्‍यांचा न केलेला विचार, तहसीलदारांवर होणारे हल्ले यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. भविष्यात आपल्या चित्रपटांतून सामाजिक मद्यांना अधोरेखित करणार असल्याचं सांगतानाच 'मुळशी पॅटर्न'नंतर आता  'रेती पॅटर्न' घेऊन येणार असं प्रवीण तरडे म्हणाले. देशाचा विकास करताना आपण शेतकर्‍यांचा विचारच करत नाही ही आपली खरी समस्या आहे. माझा चित्रपट हा शेतकर्‍यांना सजग करेल. शेती ही विकण्यासाठी नव्हे तर राखण्यासाठी असते असे संवाद यामध्ये आहेत.