बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (11:39 IST)

"तलाव" सिनेमात संजय खापरे पुन्हा एकदा खलनायकी भूमिकेत

'खलनायक' सिनेमातील संजय दत्तची भूमिका अशी काही गाजली की, त्यानंतर प्रेक्षक खलनायकाच्याही प्रेमात पडले. व्हिलनचं सुद्धा प्रेक्षकांनी कौतुक केलं आणि त्यांची नोंद पुरस्कारांनी देखील घेतली. मराठी चित्रपट सृष्टीतही असे अनेक खलनायक आहेत ज्यांची दहशत आणि अभिनय प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहे. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले, रमेश देव यांची नावं आवर्जून घेता येतील . गेल्या काही सिनेमांच्या माध्यमातून उत्तम खलनायक म्हणून अभिनेता संजय खापरे यांनी स्वतःचा एक वेगळाच ठसा निर्माण केला आहे.  'फक्त लढ म्हणा', 'दगडी चाळ', 'डिस्को सन्या' या सिनेमातील सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांनी पसंती दिली. त्यांच्या आणखी एका खलनायकी अभिनयाची झलक १० मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'तलाव' या सिनेमात दिसणार आहे. नवनीत मनोहर फोंडके यांच्या एसएमव्ही फिल्म्स निर्मित तलाव सिनेमाचे दिग्दर्शन जयभीम कांबळे यांनी केलं आहे. छायांकनाची जबाबदारी प्रमोद श्रीवास्तव यांनी सांभाळली आहे. 'तलाव' सिनेमातील रावडी भूमिका संजय खापरे यांच्या अभिनयाची आणखी एक अनोखी झलक दाखवेल. निगेटिव्ह भूमिका ताकदीने वठवण्याचा हातखंडा असलेल्या संजय खापरे यांच्या या सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे. 'तलाव' सिनेमात साकारलेला मुजोर, गर्विष्ठ आणि उन्मत्त धनंजय पाटील आपल्या सभोवताली असणाऱ्या समाज कंटकांची नेमकी प्रतिमा उभी करतो. त्याच्या दहशतीतून गावकऱ्यांची सुटका करण्यासाठी आशेचा किरण असलेल्या आशापुरी देवीचा घातलेला गोंधळ या भूमिकेचं गांभीर्य वाढवतो. गोंधळ मांडला...हे गोंधळ गीत प्रसिद्ध लोकशाहीर नंदेश उमप यांच्या तुफान आवाजात स्वरबद्ध झाले असून आशिष आंबेकर यांनी संगीतबद्ध केले आहे. अभिनेता सौरभ गोखले आणि संजय खापरे यांची जोडी  या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र येत आहे. प्रियांका राऊत या अभिनेत्रींच्या रूपाने फ्रेश चेहरा मराठी चित्रपट सृष्टीला मिळाला आहे.  सिबा पीआर अँड मार्केटींग हे या सिनेमाची प्रसिद्धी सांभाळत असून हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात १० मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.