सोमवार, 27 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 26 जुलै 2021 (22:16 IST)

'आणि काय हवं' म्हणत जुई आणि साकेत पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

Saying 'And what do you want'
बऱ्याच प्रतीक्षेनंतर आपल्या सर्वांची आवडती ऑफस्क्रीन जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'आणि काय हवं' मधील जुई आणि साकेत लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. एमएक्स एक्सक्लुझिव्ह आणि अ मिर्ची ओरिजनल्स क्रिएशन वर 'आणि काय हवं'चा तिसरा सीझन लवकरच येत आहे.  
 
'आणि काय हवं'चा पहिला सिझन आला आणि बघता बघता त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. जुई आणि साकेत प्रत्येकालाच आपल्या घरातीलच एक वाटू लागले. अल्पावधीतच त्यांनी प्रेक्षकांना आपलेसे केले. आता परत ते आपल्या भेटीला येत आहेत. त्यांचे रुसवे फुगवे, त्यांच्या आयुष्यातील गंमतीजंमती, त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटना लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 
 
वरूण नार्वेकर दिग्दर्शित या गोड आणि गुणी जोडप्याची गोष्ट असलेल्या ‘आणि काय हवं' सिझन ३ चा ट्रेलर २८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.