रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (16:01 IST)

सिद्धार्थ आणि श्रुतीची प्रेंग्नन्सी होणार अधिकच रंजक

baby on board
'बेबी ऑन बोर्ड'चे नवीन एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित...

'बेबी ऑन बोर्ड'च्या पहिल्या दोन एपिसोड्सला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आता पुढे श्रुती आणि सिद्धार्थच्या जर्नीमध्ये काय होणार, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. श्रुती आणि सिद्धार्थच्या आतापर्यंतच्या प्रवासात श्रुतीचे डोहाळे, प्रेग्नंसी डाएटची काळजी घेणारा सिद्धार्थ सर्वांनी पाहिला. या पुढच्या प्रवासात श्रुतीची डॅाक्टर व्हिजीट, सोनोग्राफी, सिद्धार्थची बाळ बघण्याची उत्सुकता, एक बेस्ट डॅडी बनण्यासाठीची धडपड यात पाहायला मिळत असून याव्यतिरिक्त दोघांच्या आईबाबांच्या ‘सरप्राईज व्हिजीट’ने यात अधिकच रंगत आणली आहे. आज 'बेबी ऑन बोर्ड' चे पुढील एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. यात प्रतीक्षा मुणगेकर आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात , " 'बेबी ऑन बोर्ड'चे पहिले दोन एपिसोड्स प्रदर्शित होऊन प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, याचा 'बेबी ऑन बोर्ड'च्या संपूर्ण टीमला आनंद आहे. ‘मॅाम टू बी’ आणि ‘डॅड टू बी’ची धमाल जर्नी यात आहे. त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी आपल्या जवळची वाटणारी आहे. पुढच्या सर्व एपिसोड्सला तसेच ‘बेबी ऑन बोर्ड’ सिरीजला असाच उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे."

प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत 'बेबी ऑन बोर्ड' या सीरिजचे दिग्दर्शन सागर केसरकर यांनी केले आहे. निर्माते साईनाथ राजाध्यक्ष व बिना राजाध्यक्ष असून अंकित शिंदे व दिव्या घाग हे कार्यकारी निर्माते आहे.
Published By -Smita Joshi