1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (11:37 IST)

या अभिनेत्याने कुत्रा समजून आणलं डुक्कराचं पिल्लू

The actor mistook the dog for a piglet ashaya kulkarni
अभिनेता आशय कुलकर्णी याने एका मुलाखतीत आपल्या लहानपणाचा किस्सा सांगितला. आशय कुलकर्णीचा व्हिक्टोरिया हा चित्रपट 13 जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. पुष्कर जोग आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील या चित्रपटात आहे. आशयने एका मुलाखतीत लहानपणाचा एक किस्सा सांगितला आशयला प्राण्याची आवड लहानपानापासून असल्यामुळे  लहानपणी कुत्र्याचं पिल्लू समजून त्याने घरात डुक्करांचं पिल्लू  आणले.

त्याला खाण्यासाठी बिस्कीट दिल्यावर पिल्लाला घरातील बाल्कनीत ठेवलं. बाबा बाहेरगावी गेले होते. त्यांना घरी आल्यावर पिल्लाचा आवाज आला.त्यांना घरात उंदीर शिरले असे वाटले. त्यांनी घरात सगळीकडे शोधाशोध केली आणि बाल्कनीचं दार उघडल्यावर डुक्कराचं ते पिल्लू सर्व घरभर धावू लागलं. त्याने घरात सर्वदूर धिंगाणा घालत  देवघरातील देव पाडले. मी झोपलो होतो. मला घरात काय सुरु आहे हे देखील माहित नव्हते. बाबांनी माझ्या खोलीत येऊन मला उठवून चांगलाच चोप दिला. नंतर आईने मला आपण कुत्र्याचं पिल्लू आणायचं का असं विचारल्यावर मी बाबांनी दिलेल्या मारला घाबरून नाही म्हणायचो. असे सांगितले. 
 
Edited By- Priya Dixit