शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जानेवारी 2024 (16:23 IST)

भैरवनाथ आणि जोगेश्वरीच्या आयुष्यात येणार एक महत्त्वपूर्ण वळण

‘जोगेश्वरीचा पती भैरवनाथ’ च्या आगामी भागांमध्ये त्यांच्या प्रेमाच्या नशिबाची चाचणी होणार
 
शेमारू मराठीबाणाची लोकप्रिय पौराणिक मालिका "जोगेश्वरीचा पती भैरवनाथ", ही मालिका जोगेश्वरी आणि भैरवनाथ यांच्याभोवती साकारली गेली आहे , ते दोघेही त्यांच्या मानवी भावना आणि दैवी कर्तव्ये यांच्यातील नाजूक संतुलन ठेवण्यात गुंतले आहेत. साधारण पुढच्या कथेत, जोडप्याला एक निर्णायक क्षणाचा सामना करावा लागणार आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रेमकथेचे भाग्य अनिश्चित असेल.
 
त्यांच्या आनंदी वैवाहिक जीवनाच्या पुढच्या टप्प्यात जाण्यापूर्वी, भैरवनाथ आणि जोगेश्वरी एकत्र महादेव आणि पार्वतीची विशेष पूजा करतात. तथापि, विधीच्या वेळी, फक्त भैरवनाथ महादेवांचा आवाज ऐकतो, त्याला भेटण्यासाठी महादेव ही गोष्ट गोपनीय ठेवण्याच्या सूचनांसह भैरवनाथला कैलासावर बोलावून घेतात. खूप दिवसांनी महादेवांना भेटल्याचा उत्साह आवरता न आल्याने, लवकरच परत येण्याच्या आशेने भैरवनाथ काही अज्ञात कामासाठी निघून जाण्याचे निमित्त करतो.
 
ह्याचा दरम्यान, भैरवनाथाच्या अचानक जाण्याने आणि दीर्घकाळ अनुपस्थितीमुळे जोगेश्वरी चिंताग्रस्त होते. परत आल्यावर, भैरवनाथ समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो पण जोगेश्वरीच्या दुखावलेल्या भावना आणि भैरवनाथ हा त्याचा कर्तव्यात अडकलेला दिसून येतो. परिणामी त्यांच्यातील अडचणी वाढताना दिसतात, भैरवनाथला त्याच्या कठीण स्थितीबद्दल जोगेश्वरीची माफी मागायला भाग पाडते.
 
भैरवनाथ जोगेश्वरीच्या भावनांशी संघर्ष करत असताना, मलय्या अवांछित विवाह प्रस्तावातून सुटण्यासाठी मदतीची प्रार्थना करत असल्याचे भैरवनाथाला जाणवते. दैवी जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पार पाडत, भैरवनाथ मलय्याला मदत करण्याचा निर्णय घेतो, नकळतच जोगेश्वरीला दुर्लक्षित वाटू लागते. भावना आणि गैरसमजांच्या या गुंतागुंतीच्या जाळ्यात, जोगेश्वरी आणि भैरवनाथ एका निर्णायक टप्प्यावर पोहोचतात, त्यांच्या नात्याच्या भविष्याबद्दल ते दोघेही अनिश्चित आहेत. भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांचातील गैरसमज मिटतील का?  हे जाणून घेण्यासाठी पहा, 'जोगेश्वरीचा पती भैरवनाथ' दर सोमवार ते शनिवार रात्री  8.30 वाजता फक्त शेमरू मराठीबाणावर.