1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन

Veteran Marathi actor Vijay Chavan dies
ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं  दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं आहे. मुंबईतील मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत सुधारली होती. मात्र अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
विजय चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवत होते. मोरुची मावशी या नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवले होते. हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहते. त्यांनी जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली होती. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.