ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री सविता मालपेकर यांना ऑल आर्टिस्ट फाउंडेशन संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर
अभिनेत्री सविता मालपेकर ( Savita Malpekar) यांना ऑल आर्टिस्ट फाउंडेशन संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. या संस्थेचा चौथा वर्धापन दिन मंगळवार 5 नोव्हेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे साजरा करण्यात आला. या संस्थे तर्फे एक दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या महोत्सवात यंदाचा कला भूषण पुरस्कार देण्यात आले असून सविता मालपेकर यांना जाहीर झाला.
पुरस्कार समारंभाआधी दु. 4.30 वा. ओंकारेश्वर मंदिर पासून बालगंधर्व रंगमंदिर पर्यंत आयोजित करण्यात आलेली जीवनगौरवार्थीची भव्य मिरवणूक हे या समारंभाचे खास वैशिष्ट्य होते.
कलाक्षेत्रातील विविध कार्यासाठी निर्माती आणि दिग्दर्शिका ॲड. समृद्धी पोरे, अभिनेते मिलिंद गवळी, अशोक शिंदे, विनोद खेडकर, लावणी कलाकार मेघा घाडगे, तमाशा कलावंत मंगलाताई बनसोडे, लोककला निर्माता उदय साटम, वाद्यवृंद क्षेत्रातील योगदानाबद्दल अशोक कुमार सराफ क्रांती मळेगावकर
नाट्य व्यवस्थापन मोहन कुलकर्णी, वाद्यवृंद क्षेत्रातील प्रदीप बकरे, भरत मोकाशी, ध्वनी तंत्रज्ञ क्षेत्रातील योगदानाबद्दल बाबा रफिक ,नंदू पळीवाले या सर्वांना कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून सायंकाळी 7:30 वाजता गोल्डन एरा या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता करण्यात आली.
Edited By - Priya Dixit