Widgets Magazine

लोढा समिती अभ्यासासाठी बीसीसीआयची समिती गठीत

bcci
लोढा समितीच्या शिफारशी बीसीसीआयच्या प्रशासनात सहजतेने कशा लागू करता येतील याचा अभ्यास करण्यासाठी बीसीसीआयकडून एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजीव शुक्‍ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सात सदस्यांचा समावेश आहे. अन्य सहाजणांमध्ये बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी, खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांच्यासह सौरव गांगुली, टी. सी. मॅथ्यू, नबा भट्टाचारजी, जय शाह यांचाही समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या कठोर शिफारशींपासून बीसीसीआयला आणि संलग्न असोसिएशन्सना वाचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा आटापिटा अजूनही सुरू आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी घेण्यात आला होता. लोढा समितीच्या शिफारशींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 14 जुलैला होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या नव्या समितीला आपला अहवाह किमान 10 जुलैपर्यंत तयार करावा लागणार आहे.


यावर अधिक वाचा :