शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 27 एप्रिल 2017 (10:21 IST)

बीसीसीआयच्या वर्चस्वाला धक्का

बीसीसीआयचा तीव्र विरोध असलेल्या आंतरराष्ट्रीय  क्रिकेट परिषदेमधील (आयसीसी)  प्रशासकीय आणि महसूल रचनेचे बदल बहुमताने मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे जगातील सर्वांत श्रीमंत संघटना असलेल्या बीसीसीआयच्या वर्चस्वला जबर धक्का बसला आहे. आयसीसीचे पहिले स्वतंत्र चेअरमन असलेल्या शशांक मनोहर यांच्या रणनीतीने बीसीसीआयची ‘विकेट’ घेतल्याचे मानले जात आहे. 
 
दुबई येथे सुरू असलेल्या आयसीसीच्या बैठकीत प्रशासकीय आणि घटनात्मक बदल 1 विरुद्ध 9 मतांनी मंजूर करण्यात आले. या बदलांविरुद्ध एकमेव मत बीसीसीआयतर्फे टाकण्यात आले. आयसीसी आणि बीसीसीआयदरम्यान वादाचा विषय ठरलेला महसूल वाटप रचनेतील बदल 8 विरुद्ध 2 मतांनी मंजूर करण्यात आला. भारताशिवाय श्रीलंकन क्रिकेट मंडळाने याविरुद्ध मतदान केले. 
 
बीसीसीआयचे कामकाज पाहण्यासाठी नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीला देखील हा जबर धक्का मानला जात आहे. आयसीसीमधील बहुतेक सर्व सदस्य देश बीसीसीआयला पाठिंबा देतील, असा विश्‍वास समितीने व्यक्त केला होता.