Widgets Magazine
Widgets Magazine

भुवनेश्वरचा कसोटी संघात समावेश

मुंबई, बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 (10:36 IST)

पाठदुखीच्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला सिमर गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या क्रिकेट कसोटीसाठी भारताच्या संघात पुन्हा पाचारण करण्यात आले आहे. इंग्लंड संघ सध्या भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा या दौऱ्याला मुकला आहे. तर पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान मिळालेल्या गौतम गंभीरला उर्वरित तीन सामन्यांमधून वगळण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने संघात पुनरागमन केले आहे. रणजीत भुवनेश्वरने ३६ षटकांत दोन विकेटही घेतल्या होत्या. त्यामुळे त्याचा संघात पुनरागमन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्णधारपदाची धूरा विराट कोहलीकडेच असून अजिंक्य रहाणे, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, करुण नायर, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, जयंत यादव, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. 



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

भारताचा 246 धावांनी विजय!

भारताने डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-वीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा ...

news

अभिनय करणार सेहवाग!

भारतीय क्रिकेट संघामधील एक हरहुन्नरी नाव म्हणजे विरेंद्र सेहवाग. क्रिकेच्या ...

news

सचिनने तरुणाच्या घरी जाऊन निभावला वादा

विजयवाडा- क्रिकेटर सचिन तेंडुलकरने दोन वर्ष पूर्वी केलेला वादा आंध्र प्रदेशाच्या एसपीएस ...

news

तिसर्‍या पंचांना जादा अधिकार हवे: सचिन

मुंबई- खेळाडूंनी डिसीजन रिव्ह्यू सीस्यीमचा वापर केला नाही, तर तिसर्‍या पंचांनी योग्य ...

Widgets Magazine