शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (20:41 IST)

टीम इंडियाला मोठा धक्का,जसप्रीत बुमराह T20 विश्वचषकातून बाहेर

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे 2022 च्या T20 विश्वचषकातून बाहेर पडल्याने भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहची दक्षिण आफ्रिकेतील टी-20 मालिकेसाठीही निवड झाली होती, मात्र पहिल्या सामन्यात अनफिट असल्यामुळे तो खेळू शकला नाही.नंतर असे सांगण्यात आले की त्याला स्ट्रेस फ्रॅक्चर झाला आणि तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळू शकला नाही.
 
जसप्रीत बुमराहला आयसीसी पुरुषांच्या T20 विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बोर्डाच्या वैद्यकीय संघाच्या हवाल्याने सांगितले.
तपशिलवार मूल्यमापन आणि तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे टीमने सांगितले.बीसीसीआय आता लवकरच बुमराहच्या बदलीची घोषणा करणार आहे. 
 
Edited By - Priya Dixit