1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

गंभीर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार

Gautam Gambhir steps down as Delhi Daredevils
गौतम गंभीरने दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे. गंभीरऐवजी आता श्रेयस अय्यर दिल्लीची धुरा सांभाळणार आहे.
 
आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने आतापर्यंतच्या 6 सामन्यांपैकी 5 सामने गमावले आहेत. सततच्या पराभवामुळे गंभीरने कर्णधारपदावरुन पायउतार होणं पसंत केलं. सध्या दिल्लीचा संघ गुणतालिकेत तळाला आहे.
 
“सध्या आम्ही ज्या स्थानी आहोत, त्याची सर्वस्वी जबाबदारी मी स्वीकारतो. मी कर्णधारपदावरुन पायउतार होतोय. श्रेयस अय्यर नवा कर्णधार असेल. आम्ही संघ म्हणून आम्ही एकत्र असून, परिस्थिती बदलण्याची क्षमता या संघात आहे, असा माझा विश्वास आहे”, असं गौतम गंभीरने सांगितेल. 
 
यापूर्वी  गंभीर  कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधारपद भूषवत होता. गंभीरच्या नेतृत्त्वात कोलकाताने दोनवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. मात्र गंभीरला तोच फॉर्म दिल्ली संघासोबत कायम राखता आला नाही.