1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2019 (10:51 IST)

मग विश्वचषकात समालोचक म्हणून कसे काम करू शकतात ?

can we act
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लोकपाल डीके जैन यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना तंबी दिली आहे. हे तिघेही सध्या क्रिकेट विश्वचषकात समालोचन करत आहेत. त्यांच्या या भूमिकेवर डीके जैन यांनी आक्षेप नोंदवला आहे. हे तिघेही जण आयपीएलमधील काही संघांशी जोडले गेले आहेत. मग ते विश्वचषकात समालोचक म्हणून कसे काम करू शकतात? डी.के. जैन यांच्या या आक्षेपानंतर हे प्रकरण बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीकडे जाऊ शकते. 
 
याविषयी बोलताना प्रशासकीय समितीच्या एका सदस्याने सांगितले की, आमची समिती जैन यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांविषयी विचारविनिमय करत आहे. यावर लवकरच काहीतरी तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी म्हटले.