एकदिवसीय क्रमवारीत मिताली राज पुन्हा अव्वल, स्मृती मंधाना टी -२० मध्ये करिअरच्या सर्वोत्कृष्ट तिसर्या स्थानावर आहे

दुबई| Last Modified मंगळवार, 20 जुलै 2021 (17:29 IST)
भारतीय कर्णधार मिताली राजने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या (ICC) ताज्या महिला वनडे फलंदाजी क्रमवारीत 762 गुणांसह अव्वल स्थान गाठले. स्मृती मंधानाचा देखील नवव्या स्थानासह पहिल्या दहामध्ये समावेश आहे. मिताली 16 वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी प्रथमच फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठल्यानंतर 9 व्या वेळी प्रथम क्रमांकाची फलंदाज ठरली आहे. मागील क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणारी वेस्ट इंडीजची कर्णधार स्टेफनी टेलर पाचव्या स्थानावर घसरली आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील मालिकेनंतर क्रमवारीत सुधारणा करण्यात आली आहे. टेलरने 30 गुण गमावले आहेत.
गोलंदाजांच्या यादीत झुलन गोस्वामी पाचव्या क्रमांकासोबत शीर्ष 10मध्ये सामील एकमेव भारतीय गोलंदाज आहे, तर दीप्ती शर्मा अष्टपैलू क्रमवारीत 10 व्या स्थानावर आहेत. महिला टी -20 आंतरराष्ट्रीय खेळाडू रँकिंगमध्ये भारतीय सलामीवीर मंधाना तिच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट रँकिंगच्या बरोबरीने तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या आणि अंतिम टी -२० सामन्यात तिने 70 धावा केल्या होत्या, जे गेल्या आठवड्यात तिचा हा एकमेव सामना होता.
टेलरला अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तोटा सहन करावा लागला
मंगळवारी झालेल्या साप्ताहिक अपडेटमध्ये वेस्ट इंडिजची कर्णधार टेलरला 30 गुणांचा तोटा सहन करावा लागला. पाच सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडीजने पाकिस्तानला 3-2 असे पराभूत केले. साप्ताहिक क्रमवारीत टेलरला तिनापैकी दोन सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली. तिने

49 आणि 21 धावा केल्या. मालिकेच्या पहिल्या सामन्यात नाबाद शतकी खेळीसह गेल्या आठवड्यात एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळविणाऱ्या टेलरनेदेखील ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान गमावले आहे. टेलरला तीन सामन्यांत कोणतेही बळी मिळू शकले नाहीत, त्यामुळे अष्टपैलूंच्या यादीत तीही तीन स्थानांवर घसरली आहे.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

IND vs SL: कोरोना पॉझिटिव्ह निघाला क्रुणाल पांड्या

IND vs SL: कोरोना पॉझिटिव्ह निघाला क्रुणाल पांड्या
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह ठरला आहे, त्यामुळे ...

IND vs SL, 2nd T20I: क्रुणाल पांड्या कोविड -19 पॉझिटिव्ह, ...

IND vs SL, 2nd T20I: क्रुणाल पांड्या कोविड -19  पॉझिटिव्ह, दुसरा टी -२० स्थगित
आज (27 जुलै) भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दुसरा टी -20 सामना पुढे ...

IND vs SL 2nd T20: पाऊस खेळ खराब करेल का? हवामान जाणून घ्या

IND vs SL 2nd T20: पाऊस खेळ खराब करेल का? हवामान जाणून घ्या
तीन सामन्यांच्या मालिकेचा दुसरा टी 20 आंतरराष्ट्रीय सामना आज रात्री कोलंबोच्या आर ...

भूताने क्रिकेट सामना रोखला! बेल्स पडताना बघून क्रिकेटर्स ...

भूताने क्रिकेट सामना रोखला! बेल्स पडताना बघून क्रिकेटर्स आश्चर्यचकित झाले
कधी कधी क्रिकेटच्या क्षेत्रात विचित्र गोष्टी घडतात. झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यातील ...

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध पहिला टी- 20 भारताने सहज जिंकला, ...

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध पहिला टी- 20 भारताने सहज जिंकला, कर्णधार शिखर धवनने या खेळाडूंना विजयाचे श्रेय दिले
सूर्यकुमार यादवच्या अर्धशतक आणि कर्णधार शिखर धवनच्या 46 धावांनी श्रीलंकेविरुद्धच्या तीन ...