बुधवार, 17 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 12 जानेवारी 2022 (22:38 IST)

IND vs SA: विराट कोहलीने एक कॅच घेऊन आणखी एक विक्रम केला, कसोटीत सर्वाधिक कॅच घेणारा सहावा भारतीय खेळाडू ठरला

IND vs SA: Virat Kohli sets another record with one catch
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक कसोटी सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज 12 जानेवारी हा दुसरा दिवस आहे. यादरम्यान भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. खरंतर, विराट कोहलीने या सामन्यात आपला 100 वा कसोटी कॅच पकडला आहे. अशा परिस्थितीत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक कॅच पकडणारा कोहली 6वा खेळाडू ठरला आहे. 
बावुमाच्या रूपाने विराट कोहलीने त्याचे 100 वा कॅच घेतला. माजी क्रिकेटर आणि भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. राहुल द्रविडने 163 सामन्यात 209 कॅच  घेतले आहेत. या यादीत व्हीव्हीएस लक्ष्मणचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. लक्ष्मणने 134 कसोटी सामन्यांमध्ये 135 झेल घेतले आहेत. 
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव तिसऱ्या क्रमांकावर येते. सचिनने 200 सामन्यात 115 कॅच घेतले आहेत. सुनील गावसकर 108 कॅच सह चौथ्या क्रमांकावर आणि मोहम्मद अझरुद्दीन 105 कॅच सह पाचव्या क्रमांकावर आहे. 
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, लंच ब्रेकनंतर भारतीय संघाच्या गोलंदाजांनी तगडी गोलंदाजी केली. मोहम्मद शमीने एका ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने पहिल्या दिवशी 223 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला लवकरात लवकर गुंडाळण्याची टीम इंडियाची नजर असेल.