रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (16:02 IST)

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध T20 मध्ये टीम इंडियाने केला अनोखा विक्रम

भारतीय क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा 4-1 असा पराभव केला. त्याने रविवारी   फ्लोरिडा येथे खेळलेला पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना 88 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 188 धावा केल्या. श्रेयसने 64 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 100 धावा करून सर्वबाद झाला. या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांची झलक पाहायला मिळाली.
 
भारतासाठी अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंनी घातक गोलंदाजी केली. बिष्णोईने चार गडी बाद केले. त्याचवेळी अक्षर आणि कुलदीपने प्रत्येकी तीन बळी घेतले. म्हणजेच वेस्ट इंडिजच्या सर्व 10 विकेट भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या. एखाद्या संघाच्या फिरकीपटूंनी विरोधी संघाला ऑलआउट करण्याची टी-20 इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. असे करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.
 
अर्शदीप सिंगला प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला. या मालिकेत त्याने पाच सामन्यांत सात विकेट घेतल्या. तर अक्षर पटेल सामन्याचा गेम चेंजर ठरला.
 
भारताने आतापर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध 25 टी-20 सामने खेळले आहेत. टीम इंडियाने यापैकी 17 सामने जिंकले तर सात सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. एका सामन्याचा निकाल लागला नाही. भारताने विंडीजविरुद्ध आठ टी-20 मालिका खेळल्या आहेत. यापैकी टीम इंडियाने सहा मालिका जिंकल्या आहेत.