गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : रविवार, 27 मार्च 2022 (15:52 IST)

IND W vs SA W: भारताचा एका रोमांचक सामन्यात पराभव, विश्वचषकातून बाहेर

भारतीय संघाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले. मिताली राजच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून तीन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्यासही मुकला आणि स्पर्धेतून बाहेर पडला.
 
टीम इंडियाच्या पराभवासह वेस्ट इंडिजचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. गुणतालिकेत ती चौथ्या स्थानावर आहे. भारताचा पराभव आणि शेवटचा साखळी सामना संपल्याने महिला विश्वचषक 2022 च्या चार उपांत्य फेरीतील खेळाडूही निश्चित झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने आधीच उपांत्य फेरी गाठली होती आणि आज इंग्लंड आणि नंतर वेस्ट इंडिजचा संघही नॉकआऊटफेरीत पोहोचला.