मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (11:15 IST)

भारतीय चाहत्यांना मिळणार क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश

50 टक्के दर्शकांना प्रवेश देण्यावर विचार

Indian fans
पुढील महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू होणार असून ही मालिका स्टेडियममध्ये जाऊन पाहता येईल. ऑस्ट्रेलियात ज्याप्रमाणे मैदानात काही प्रमाणात प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे भारतात देखील दिली जाऊ शकते.
 
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्या ने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडविरुद्ध चेपॉक आणि मोटेरा स्टेडियमवर होणार्या कसोटी मालिकेत मैदानाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के दर्शकांना प्रवेश देण्यावर विचार सुरू आहे. पाच फेब्रुवारीपासून सुरू होणार्या  या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत होणार आहेत. या नंतरचे दोन अहमदाबाद येथे होतील.
 
सध्या तरी आम्ही 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देऊ शकतो. याबाबत दोन्ही संघ आणि आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि चेन्नई तसेच अहमदाबाद येथील रुग्णांची संख्या अधिक असल्यास निर्णय बदलला जाऊ शकतो. आवश्यक ती काळजी घेऊन 50 टक्के परवानगी दिली जाऊ शकते.
 
इंग्लंडविरुद्धत्या मालिकेत जर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सामना पाहण्याची संधी मिळाली तर आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी चाहत्यांना मैदानावर प्रवेश मिळू शकेल. 
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकल्याने भारतीय चाहते आनंदात आहेत. आता या आनंदात आणखी वाढ होणार आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे भारतात क्रिकेट सामने झाले नाहीत. भारतीय संघ आता एक वर्षानंतर घरच्या मैदानावर क्रिकेट खेळणार आहे.