सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (21:39 IST)

IPL 2021: हर्षल पटेलने आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला, जसप्रीत बुमराह ला मागे सोडले

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या 52 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. अबू धाबीच्या शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात बंगळुरूचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने एक विशेष विक्रम आपल्या नावावर केला आहे. हैदराबादचा फलंदाज ऋध्दिमान साहाला त्याने पॅव्हेलियनची वाट दाखवताच त्याच्या नावावर आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनण्याची नोंद झाली आहे.