1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (13:36 IST)

गोव्याच्या पर्यटन विभागा कडून माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला नोटीस

Notice to former cricketer Yuvraj Singh  tourism department of Goa  Cricket News In marathi
गोव्याच्या पर्यटन विभागाने माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगला नोटीस पाठवली आहे. युवराज सिंगचा मोरजिममध्ये व्हिला आहे. व्हिला नोंदणी न करताच 'होमस्टे' म्हणून वापर केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. युवराजला ८ डिसेंबर रोजी सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. गोवा पर्यटन व्यवसाय कायदा, 1982 अंतर्गत नोंदणी केल्यानंतरच राज्यात 'होमस्टे' चालविला जाऊ शकतो.
 
राज्याच्या पर्यटन विभागाचे उपसंचालक राजेश काळे यांनी 18 नोव्हेंबर रोजी व्हिला 'कासा सिंग' या पत्त्यावर नोटीस बजावली होती. यामध्ये युवराजला 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता वैयक्तिक सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा व्हिला उत्तर गोव्यातील मोरजिम येथे आहे.
 
पर्यटन व्यापार कायद्यांतर्गत मालमत्तेची नोंदणी न केल्याबद्दल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई का करू नये, अशी विचारणा नोटीसमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

Edited By - Priya Dixit