1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (19:52 IST)

रोहित शर्मा कडे एकदिवसीय कर्णधार पदाची नवीन जबाबदारी

Rohit Sharma takes over as ODI captain रोहित शर्मा कडे एकदिवसीय कर्णधार पदाची नवीन जबाबदारीMarathi Cricket News  In Webdunia Marathi
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कसोटी संघ जाहीर झाला आहे. यासह रोहित शर्माकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. T20 आंतरराष्ट्रीय नंतर त्याला टीम इंडियाचा नवा एकदिवसीय कर्णधार बनवण्यात आले आहे. विराट कोहलीचे वनडे कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. अखिल भारतीय निवड समितीने शुक्रवारी हा निर्णय घेतला. टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्माला टीम इंडियाचा नवा टी-20 कर्णधार बनवण्यात आले.
 भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेत 20 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ तीनमध्ये त्यांना विजय मिळाला आहे.