शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (11:13 IST)

सचिन तेंडुलकरकडून ऑक्सिजनसाठी एक कोटी रुपयांची मदत

Sachin Tendulkar donated 1 crore to Mission Oxygen
भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी मिशन ऑक्सिजनसाठी तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली आहे. 250 उद्योजक तरूणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सचिनने सहभाग घेतला आहे. 
 
गेल्या वर्षीही सचिनने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी दिला होता. 
 
मिशन ऑक्सिजन मोहिमेसाठी एक कोटी रुपयांची मदत करत असल्याची माहिती सचिनने ट्विटरद्वारे दिली. तसेच, “मी खेळत असताना तुमच्याकडून मिळालेला पाठिंबा अमूल्य होता, त्यामुळे मी यश मिळवू शकलो…आज आपण करोनाविरोधात लढणाऱ्यांच्या मागे ठामपणे उभं राहण्याची आणि त्यांना पाठिंबा देण्याची वेळ आहे”, अशा आशयाचा संदेशही यावेळी त्याने दिला आहे.