1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 26 मार्च 2020 (11:23 IST)

सचिन तेंडुलकरने केली चाहत्यांना विनंती..

Sachin Tendulkar
करोना व्हायरसच्या तडाख्यामुळे 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा झाली आहे तरी नागरिक अजूनही परिस्थितीचं गांर्भीय समजत नाहीये आणि विनाकारण घराबाहेर निघत आहे. 
 
अनेक ‍ठिकाणी पोलिस आक्रमक झाले असून विनाकारण रस्त्यावर फिरत असणार्‍यांना चोप देत आहे. या संदर्भातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील एक संदेश दिला आहे. सचिनने म्हटले की सरकारने आम्हाला 21 दिवसांपर्यंत घराबाहेर ‍निघू नका अशी विनंती केली आहे तरी अनेक लोकं याचे पालन करत नाहीये. या संकटशच्या काळात घरत राहणे आमचे कर्तव्य आहे आणि हा वेळ घरच्यांसोबत घालवायला हवा..
 
सचिनने म्हटले की सरकारच्या विनंतीला मान द्या आणि तुम्हीही घरातच राहा.