गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 6 जुलै 2019 (15:34 IST)

महेंद्र सिंह (MS) धोनी बद्दल काही अनोख्या गोष्टी

Dhoni  देशात सर्वात जास्त आयकर भरणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे, झारखंड चा विचार करता सर्वात जास्त आयकर भरणारा व्यक्ती आहे. २०१३-१४ मध्ये धोनी ने २० कोटी रुपये आयकर भरला होता.
 
महेंद्रसिंग धोनी चे वडील पानसिंह व आई देवकी देवी यांचा विवाह १९६९ मध्ये झाला. धोनी चा जन्म ७ जुलै १९८१ ला झाला, त्याला नरेंद्र हा मोठा भाऊ व जयंती हि मोठी बहीण आहे.
 
जागतिक स्तरावर श्रीमंतीचा विचार करता Dhoni सर्वात जास्त श्रीमंत १०० खेळाडूंच्या यादीमध्ये ३१ व्या स्थानी आहे.  
२०१० मध्ये धोनी ने त्याची लहानपणीची मैत्रीण साक्षी सोबत २ वर्षांच्या रेलशनशिप नंतर डेहराडून मध्ये लग्न केले. त्याने लग्नाचा अजिबात गाजावाजा केला नाही, त्याच्या फॅन्स साठी हा सुखद धक्का होता.
 
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी धोनीने रीति स्पोर्ट्स मैनेजमेंट व माइंडस्केप वन सोबत तीन वर्षांसाठी २१० कोटींचा, भारतीय क्रीडा जगतातला सर्वात मोठा करार केला.
 
धोनीला ६ फेब्रुवारी २०१५ ला कन्यारत्न प्राप्त झालं. धोनीने त्याच्या मुलीचे नाव जीवा असं ठेवलं आहे. 
फक्त महागड्या गाड्यांचीच नाही धोनीला कुत्र्यांची देखील आवड आहे त्याच्याकडे लैब्रेडोर जातीचा “जारा” नावाचा व एल्शेशियन जातीचा “सॅम” नावाचा कुत्रा आहे.
 
हेलिकॉप्टर शॉट चा शोध धोनीनेच लावला होता. पायाजवळ पडणाऱ्या बॉलवर हेलिकॉप्टर च्या पंख्याप्रमाणे जोरदार प्रहार करून सिक्स मारण्याची करामत फक्त Dhoni च करू शकतो. धोनी हा शॉट सुरुवातीपासूनच खेळत आला आहे. हा शॉट दिसायला खूप सोपा आहे परंतु थोडी जरी चूक झाली तरी पायाला गंभीर दुखापत होऊ शकते.
 
२७ कसोटी सामने जिंकणारा Dhoni भारतचा सर्वत सफल कर्णधार आहे. त्याचा कर्णधारपदाच्या कारकिर्दीत भारतीय संघाने २७ कसोटी, ११० एकदिवसीय व ४१ ट्वेंटी-ट्वेंटी सामने जिंकले आहेत.
सुरवातीच्या काळात Dhoni क्रिकेट च्या बाबतीत जास्त सिरीयस नव्हता. त्याला बॅडमिंटन व फुटबॉल ची जास्त आवड होती. ह्या दोन्ही खेळांमध्ये त्याची जिल्हास्तरीय संघामध्ये देखील निवड झाली होती. फ़ुटबाँल मध्ये तो गोल कीपिंग करायचा म्हणून त्याच्या कोचने त्याला एकदा क्रिकेट ची मॅच खेळायला पाठवलं, त्याला ह्या खेळातील काहीच माहित नावात परंतु त्याने त्याच्या विकेट किपींग ने सर्वांना आकर्षित केलं होत.
 
१९९८ मध्ये Dhoni बिहार च्या अंडर-19 क्रिकेट टीम चा हिस्सा होता, त्यावेळी पंजाब विरुद्ध खेळताना बिहार च पराभव झाला पण धोनी च्या कामगिरीच्या जोरावर त्याचा समावेश बिहार च्या रणजी टीम मध्ये करण्यात आला.
 
त्यांनतर त्याला रेल्वे कडून टिकट कलेक्टर ची नोकरी मिळाली व खड़गपुर रेल्वे स्टेशनवर पोंस्टिंग मिळाली, कुटुंबासाठी मदत म्हणून धोनीने हि २००१-२००३ पर्यंत हि नोकरी केली. त्यांनतर त्याला भारतीय टीम मध्ये जागा मिळाली व त्याने हि नोकरी सोडली.