testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सचिनचा सुपरफॅन म्हणतोय 'रंग दे तिरंगा'

sudhir kumar
नवी दिल्ली| Last Modified बुधवार, 28 फेब्रुवारी 2018 (11:55 IST)
क्रीडाविश्वात खेळाडूंच्या वाट्याला प्रसिद्धी येते. पण, याच खेळाडूमुंळे त्यांचे चाहतेही प्रसिद्ध होतात. असाच एक चाहता म्हणजे सुधीर कुमार चौधरी. क्रिकेटच्या मैदानात सचिनचे नाव अंगावर रंगवून तिरंग्याच्या रंगात स्वतःला रंगवून हातात भलामोठा तिरंगा मोठ्या अदबीने घेऊन मैदानात खेळाडूंना प्रोत्साहित करणारा हा सुपरफॅन सुधीर. विविध माहितीपट आणि लघुपटांमधून झळकलेला आणि आपल्या आगळ्यावेगळ्या अंदाजासाठी प्रसिद्ध असणार्‍या सुधीरला आता एक महत्त्वाची संधी मिळाली आहे. ज्यामुळे तो चाहत्यांच्या दुनियेतला सुपरस्टार झाला, असे म्हणायला हरकत नाही.
यंदाच्या वर्षी अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या प्रमोशनसाठी 'सोनी पिक्चर्स स्पोट्‌र्स नेटवर्क'ने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. 'रंग दे तिरंगा' असे या उपक्रमाचे नाव असून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोनी वाहिनीतर्फे एक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला असून सुधीर कुमार चौधरी त्या व्हिडिओमध्ये सर्वांनाच प्रोत्साहित करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर चर्चेत असणार्‍या या व्हिडिओमध्ये ते क्रिकेटविषयी किंवा फक्त
सचिनविषयीच बोलत नसून संपूर्ण देशातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तो क्रीडारसिकांना विनंती करत आहे. ङङ्गरंग दे तिरंगा' असे म्हणत सुधीरने राष्ट्रकुल स्पर्धेतील विविध खेळांध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या चमूला प्रोत्साहन देण्याचे आवाहन सर्वांना केले आहे. मुळात एक चाहता मिळून आता आणखी किती क्रीडारसिकांना एकत्र आणतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


यावर अधिक वाचा :

पत्नी आणि मुलगी यांच्यातील वादामुळे परेशान होते भय्यु ...

national news
राष्ट्रीय संत भय्यु महाराज यांच्या मृत्यूमुळे केवळ इंदूरच नव्हे तर देशातील त्यांच्या अनेक ...

किम जोंग आणखी एक विचित्र प्रकार उघड

national news
सिंगापूरमध्ये अमेरिकेसोबत शिखर परिषदेसाठी आलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांची ...

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

national news
जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला ...

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार

national news
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अंत्यसंस्कार ...

भय्यु महाराजांचे सुसाइड नोट, मी तणावात दुनिया सोडून जात आहे

national news
इंदूर- आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे ...